रिंगणबद्दल

रिंगण आहे तरी काय ?

संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारा आषाढी एकादशीनिमित्त प्रकाशित होणारा पहिला आणि एकमेव वार्षिक अंक.

संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर यांच्यावरील अंकानंतर यावर्षी संत गोरा कुंभार विशेषांक.

दिवाळीचे अंक असतात, तर महाराष्ट्राचा सर्वात मोठा सोहळा असलेल्या आषाढी एकादशीचे अंक का नाहीत, या प्रश्नाचं उत्तर.

दरवर्षी एका संताच्या विचारांचा, चरित्राचा आणि प्रभावाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरुण पत्रकार आणि जाणकार अभ्यासक यांनी परंपरेचा वेध घेत केलेली नवी मांडणी.

प्रचंड प्रतिसाद. वारकरी, वाचक, अभ्यासक आणि प्रसारमाध्यमांनी केलं स्वागत.

संतपरंपरेचा विचार तरुणांनी तरुणांच्या भाषेत तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा एक यशस्वी धडपड.