ग्लोबल गाव

सुहास सरदेशमुख

तेर खूप जुनं गाव. इतिहासात खोल खोल शिरलेलं. व्यापारामुळं जितकं संपन्न, तितकंच वेगवेगळ्या संप्रदायांच्या विचारधारांनी समृद्ध. तो सगळा वारसा पचवत संत गोरा कुंभार उभे राहिले. गोरोबांच्या जडणघडणीत या ग्लोबल गावाचं मोठं योगदान असावं. रिंगण@तेर.

किती गुंतवळ असते ना भूत आणि वर्तमानाची.

कधी तरी एखादं टोक सापडतं. ‘हाती आलं की सारं’, असं वाटू लागतं. पण नंतर कळतं, चुकीचं टोक होतं आपल्या हातात. तेर, तगर किंवा तगरपूरचं या गावांचं हे असं होतं. उस्मानाबाद ते तेर हा तसा १८ किलोमीटर प्रवास. पण तेवढ्यात इतिहासाची अनेक टोकं निसटून जात होती. ती गोळा करण्यासाठी मी तेरच्या म्युझियमसमोर पोचलो होतो.

इतिहासाचंएक टोकइथंही आहे.लातूरच्या राजस्थान विद्यालयात चटर्जी नावाचे मुख्याध्यापक होते. एक युरोपीय अभ्यासक त्यांच्याकडं आला होता. त्यालाघेऊन ते तेर या गावी आले.तोपर्यंतगोरोबाकाकांच्या गावी काही जुन्या वस्तूआणि खापरंसापडतात, हे बहुतेकांना माहीत होतं. रामलिंगअप्पा लामतुरेंच्या परिचयातल्या एकानं त्यांना पाठवलं होतं. ते गेले जुन्या वस्तूसापडतात त्या भागात. कितीतरी वस्तूपडलेल्याहोत्या. जणूइतिहासच विखरून पडलेला. त्यातल्या काही वस्तूत्या विदेशी माणसानंस्वतःच्या रुमालानं पुसल्या. त्यानंबसकणच मारली तिथं. रामलिंगअप्पा लामतुरे हे सारंबारकाईनं पाहत होते.त्यांनी चटर्जींना विचारलं,

‘एवढा काय अभ्यास करतो माणूस?’ त्या विदेशीमाणसानंसांगितलं, ही खापरं काही गोरोबाकाकांच्या चमत्काराचा भाग नाहीत. त्यापेक्षाखूप काही आहेयामध्ये.

रामलिंगअप्पा तसा हुशार माणूस. त्यांनी या वस्तूगोळा करायच्या ठरवल्या. त्यांची संख्या एवढी होती की, त्या गोळा करण्यासाठी मग लामतुरे यांनी शेतातल्या गड्याला कामाला लावलं. रोज नवी वस्तू समोर यायची. मग एके दिवशी अशा वस्तू आणून देणार्‍यांना धान्य किंवा पैसे दिले जातील, अशी दवंडीच त्यांनी गावात दिली. लोक मग वस्तू आणून देऊ लागले. एकेक वस्तू म्हणजे इतिहासातील एक एक पान. ही तेरच्या रामलिंग लामतुरे संग्रहालयाच्या स्थापनेची गोष्ट. अस्ताव्यस्त पडून असलेल्या आपल्या इतिहासाचे नवे पैलू कळत होते. इतिहास हा असा गोळा होतो.

पुन्हा एकदा नव्यानं संग्रहालय पाहताना माझ्या आठवणीत मात्र ‘पेरिप्लस ऑफ द युरोथ्रियन सी’चा अनामिक लेखक, टॉलेमी, पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील इतिहासाचेअभ्यासक, भालचंद्रनेमाडेंच्या‘हिंदू’ कादंबरीचा हिरो खंडेराव, तेरचा अभ्यास खर्‍या अर्थानं मांडणारे रा. श्री. मारेवंचीकर, रा. चिं. ढेरे, प्रभाकर दवे, अलीकडच्या उत्खननामध्येव्यग्र असणार्‍या माया पाटील अशी कितीतरी नावंइतिहासाची मांडणी नवनव्या पुराव्यासह करणारी. धागा अडीच हजार वर्ष मागे नेणारी.

तेरणा नदीचा समृद्ध परिसर. त्या नव्या वैभवशाली खुणा आता लपूनगेलेल्या. गाडल्या गेलेल्या. काय-काय लपून बसलं असेल काय माहीत? पण जेसापडलं तेही जाणिवा समृद्ध करणारंआहे. सातवाहनांच्या काळातील गावांना एक लाकडी तटबंदी असते, असं बहुतेकपुरातत्त्व विभागाचेअभ्यासक सांगतात. तेर गावातील अशी तटबंदीशोधण्यात आता अभ्यासकांना यश आलंय. सातवाहनांचा हा प्रदेशसंपन्न होता. त्यामुळं शत्रूतसेनव्हते. आक्रमणं झालीच तर ती हिंस्र पशूकरतील अशी भीती असे.त्यांना आवरता यावं म्हणून लाकडी तटबंदी. तेरमध्ये केलेल्या अलीकडच्या उत्खननामध्ये तांदळाचे दाणेही आढळले. जळालेल्यादाण्यांसारखं त्यांचं स्वरूप. खापरेआणि धान्य त्यांचं वय लपवत नाहीत, असंम्हणतात. अन्नधान्याचंवय कसंकाढलं जात असेल? ‘सी-१४’ नावाची एक चाचणी केली जाते. मानवी किंवा वनस्पतींशी जवळीक नसलेलं धान्य अॅल्युमिनियमच्या तुकड्यावर एकत्र करायचं. त्यावर ही चाचणी करायची. कलकत्ता, मुंबई, दिल्ली इथंअशा प्रकारच्या चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा आहेत. अशा प्रकारच्या वैज्ञानिक चाचण्यांतून सातवाहन काळातील राहणीमान आता पुढं येऊ लागलंआहे.

पूर्वी गहू, ज्वारी असंधान्य पुराविद्याशाखेतील अभ्यासकांना आढळून आलं होतं. आता आढळलंय, तेव्हातांदूळहोता, तोही मराठवाड्यात! जो प्रदेशदुसर्‍या शतकापासूनदुष्काळाशी झगडतोय. त्या भागात तांदूळहोता. याचा अर्थजसजसं पाणी कमी होत गेलं, तसतशी या भागातील संपन्नता कमी होतगेली असावी. पुरातत्त्वज्ञ माया पाटील यांचं याबाबतचंमत विचार करायला लावणारंआहे.भूकंप आणि पाण्याची कमतरता या दोनगोष्टींमुळे ही संपन्नता कमी झाली असावी. आंतरराष्ट्रीय नकाशावर व्यापारासाठी प्रसिद्ध असणार्‍या या भूभागाची कालौघात अधोगती झाली असावी. या त्यांच्या म्हणण्याला अलीकडच्या काळातील किल्लारीच्या भूकंपानं पुष्टी मिळते.

तेरणेच्याच काठी संतगोरा कुंभारांचं समाधी मंदिर आहे.देऊळ साधंसंच. आतला गाभाराही गोरोबांच्यासाधेपणाला साजेसा. तिथला गुलाबी रंगाचा खास मराठवाडी फेटा घातलेलामुखवटा. कुठून कुठून आलेले भाविक डोकंटेकवत होते. पण माझ्या डोक्यात वेगळंच चक्र सुरूहोतं. समजा गोरोबा काका तेरमध्ये जन्मलेनसते, तर तेरमधल्या प्राचीन खापरांकडंआपण वेगळ्या नजरेनं पाहिलंअसतं का? माहीत नाही. पण त्यांनी बनवलेली मातीची भांडीसर्वत्र असावीत आणि त्यांच्यासंतपणाच्या चमत्काराचा भाग म्हणून आपण इतिहासातल्या वैभवाकडं दुर्लक्ष केलं असण्याची शक्यता अधिक आहे.

किती प्रकारची मातीची भांडी असावीत तेरमध्ये काळी-तांबडी भांडी, तांबड्याझिलईचीभांडी,मॅगेरीयन भांडी आढळली. वाडगे,लोटे, गडवे, पराती अशा कितीतरी वस्तूआजही जतन केल्या आहेत. तांबड्या झिलईचीभांडी तेरमध्येसापडली तशीच ती दक्षिण अरिकमेडूच्या किनारपट्टीवरही सापडल्याचे उल्लेख रा. श्री. मोरवंचीकर नेहमी करतात. या भांड्यांवर कुंभार त्यांच्या नावाचेकिंवा श्रेणीचे ठसेउमटवत. या भांड्यांवरसुंदर नक्षीही असते. अशी भांडीरोममध्येही सापडली. तेरमध्ये रोमनव्यापाऱ्यांची वसाहत असल्याचंहीसांगितलं जातं.

केवळ भांडीचं नाही, तर तेरमध्ये पूर्वीबांगड्यांचा कारखानाही असावा, असंमानलंजातं. इथंविविध प्रकारच्या बांगड्या मिळतात. गुजरातहूनशंखआणूनतो योग्य आकारात कापूनबांगड्या केल्या जात असाव्यात. त्यावर नक्षी असे. जे शंख परिपूर्ण गोल कापता आलेनाहीत, असे शंखएकमेकांनातारेनंजोडूनही बांगड्या केल्या जात. ८-९सेंटीमीटरच्या व्यासाच्या बांगड्याही तेरमध्ये आहेत. काळ्या रंगाच्याकाचेच्याबांगड्याही अलीकडच्याच उत्खननामध्ये दिसून आल्या आहेत. हेएक मोठं जग आहे. आध्यात्मिक अंगानं विचार करत आपण हा इतिहास काहीसा वळचणीला टाकतो आहोत का, असा प्रश्न सहज मनात डोकावून जातो. पण असा प्रश्नच मुळातचूक. असंही इतिहास नुसता मिरवायचा की त्यातून धडा घेऊन मानवी जीवन अधिक समृद्ध करायचं, याचंभान काही मोजक्या व्यक्तींमध्येचअसतं.

तेर नक्की कोणाचं?सातवाहनांचं की गोरोबाकाकांचं? सातवाहनांच्यातेरमध्ये अनेकसंदर्भसमाज जीवनाचे. त्यातला एक मातृदेवतांशीसंबंधित. हेसातवाहनकालीन शिल्प. अशा अनेकमूर्तीतेर, भोकरदन, पैठणमध्ये आढळतात. लज्जागौरी या नावानंरा. चिं. ढेरे यांनी लिहिलेल्यापुस्तकामध्ये या शिल्पाचा परिपूर्ण अभ्यास मांडण्यात आलाय. शिल्पाची पाठ जमिनीला लावलेली. गुडघे संभोगाच्या सुलभतेसाठी वर मांड्यांजवळ घेतलेले. योनीप्रदेश स्पष्ट दिसेल असे. शिरोभागी कमल. शिरोभागी हात. काही शिल्पांमध्ये ते दिसतही नाहीत. कटीभोवती मणीमेखला, पायात वाळेअशा प्रकारच्या अनेकमूर्तीअजूनही उत्खननामध्येसापडतात. काय असेल याचा अर्थ? जननप्रक्रियेबाबतची उत्सुकता मानवी मनात सततची. त्यामुळंत्यांच्यापूजेची पद्धत असावी. अशा मूर्ती पदकावर कोरलेल्या आढळतात. त्या पदकांना छिद्र असतं. जणेकेरून ती गळ्यात घालनू मिरवता येतील. नेवासे, नागार्जुनकोंडा,माहूरझरी, उत्तरप्रदेशातील भीटा इथंही या मूर्तीसापडल्या आहेत. युरोप, इजिप्त आणि जावामध्येही अशा प्रकारच्या मूर्तीसापडल्या आहेत. अपत्यप्राप्तीसाठी अशा प्रकारच्या मूर्तीची पूजाहोत असावी. तुळजापूरमधल्या मातंगी देवी किंवा भूदेवीचा संबंधमातृदेवतांशीजोडलागेलेला असल्याचं ढेरे यांनी अभ्यासातून दाखवूनदिलंय.

याच काळातलंसापडलेलंमद्याचंकूपही समाजजीवनाचेछंदसांगण्यास पुरेसं ठरतं.अॅम्फोरा म्हणतात याला. चारफूट उंची. निमुळतं बूड. मानेलादोन्हीबाजूंनीमुठी. तिपाईवर ठेवतायेईल, अशी रचना. प्रामुख्यानं रोमन मद्य आयात केलंजात असे. याचा अर्थ एवढी संपन्नता होती की, या कालखंडातील व्यापार्‍यांनीलेणी उभी करण्यासही आर्थिक मदत केली असावी. सांचीच्या स्तूपाला मदत करण्याइतपत या भागातील व्यापारी श्रीमंतहोते. केवळ तगर नव्हेतर भोगवर्धन म्हणजे भोकरदन, पित्तनगल्प म्हणजेपितळखोरा हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचं केंद्र होतं.तेर, पैठण, भोकरदन ते रोम असा व्यापार चाले.भलूकच्छ म्हणजेआजचेभडोज, कलियान म्हणजेआजचेकल्याण असा व्यापारी मार्गहोता. मणी, हस्तिदंतीमूर्ती,कापड, तेल याचा व्यापार तगर भोगवर्धनमार्गे दक्षिणेत धन्यकटकाशी जोडलेलाहोता. तलम कापडाची बाजारपेठ प्रसिद्ध होती. कल्याण आणि नालासोपारा बंदरातून व्यापार होतअसे. इसवीसन पूर्वपहिल्या शतकातील हा प्रवास कमालीचा समृद्धअनुभव म्हणता येईल.

या व्यापारामध्ये हस्तिदंतीमूर्तीला कमालीचं महत्त्व होतं. फण्या, कुपी अशा वस्तू तर होत्याच. शिवाय कर्णकुंडलं, घोड्याच्या साजासाठी वापरल्या जाणार्‍या वस्तूंचाही समावेश होता. एका हस्तिदंती मूर्तीची चर्चा नेहमी होते. १२.५सें.मी.उंचीची ही मूर्ती कमालीची आकर्षक आहे. उभा चेहरा, उत्तान उरोज, आकर्षकनेत्र असणार्‍या स्त्रीनंउजव्या हातानं कर्णफुलांना हात लावला आहे. डाव्या हातानंवस्त्राचा सोगा वर उचलून धरला आहे. वस्त्र परिधान केलेली पारदर्शकमूर्ती बघताना हरखूनगेलं नाही तरच नवल. नीलवर्णी घार्‍या डोळ्याच्या अशा मूर्ती आणल्या जात. याचा अर्थकला आणि सांस्कृतिक क्षेत्रापर्यंत व्यापाराची गती होती. या काळातील विज्ञानही प्रगत होतं का? कदाचित हो असंम्हणायला वाव आहे. कारण तरंगणारी वीट ही काही गोरोबाकाकांच्या कालखंडातली नाही. पण वीट तरंगते कशी? गहूआणि तांदळाचा भुसाघालून वीट बनवली असल्यानंआत सछिद्रता तयार होते. ती हवा वीट पाण्यावर तरंगायला मदत करते. पण या विज्ञानाची कथा रामसेतूत वापरली असल्यानंया विटा जणूरामायण काळातील आहेत, असंसहजपणे सांगितलं जातंआणि त्यावर कोणाचाही विश्वास बसतो. कला, संस्कृती, बांधकाम विषयक तंत्रज्ञान असं बरंच काही इथं होतं. परिणामी एक समृद्ध कालखंड या भागात होता. तो भूकंपामुळं आणि दुष्काळामुळं पुढं रसातळाला गेला.

विपुल केशसंभार आणि अनेक पेडांच्या वेण्या हेसातवाहनकाळातील केशभूषेचं वैशिष्ट्य. तेरमध्ये सापडणार्‍या मूर्ती तशा गोबर्‍या गालाच्या आहेत. पसरट नाक, खालचा ओठ मोठा अशा अनेक मूर्ती सापडतात. शिल्पातून त्या काळातील समाजजीवन कसं असावं, याचा अंदाज बांधता येतो. भारतातील सार्थवाहपथावर म्हणजे व्यापारी मार्गावर बौद्ध भिक्खूसाठी वर्षावास उभारले होते. याच निवासांमध्ये व्यापारी थांबत. तेरच्या, भोकरदन, नेवासा या सर्व बाजारपेठांभोवती लेणी कोरलेल्या आहेत. अगदी उस्मानाबाद, औरंगाबाद शहरामध्येही काही लेणी आहेत. उस्मानाबादची अर्धवट असली तरी तिथं असं केंद्र असावं, असं वाटत होतं.

तेरचा इतिहास केवळ या वस्तूंमध्ये शिल्लक नाही. आजही गावात महादेवाची सत्तरपेक्षा अधिक छोटी-मोठी मंदिरं असतील. सर्वसाधारणपणे महादेवाची पिंड एकाच दिशेला असते. पण तेरमधील महादेव मंदिराच्या पिंडी सर्व दिशेनं आहेत. स्तूप आणि विहार आहेत. जैनांमधील अतिशय तीर्थक्षेत्र अशी तेरला मान्यता आहे. सर्व धर्मातील व्यक्तींचा वावर इथं होता, अशा खुणा गावभर विखुरल्या आहेत. एक संपन्न नदी जशी आटत गेली तसतसं तेरचं वैभव कमी होत गेलं. पुढं हा इतिहास मागं पडला आणि नंतर आध्यात्मिक नेतृत्वाची धुरा तेरमध्ये होती; अन्यथा थापटी मारून संतांचं डोकं नीट आहे का, अशी लोककथा टिकली कशी असती? तत्त्वज्ञानाच्या पातळीवर नीती-अनीतीच्या चौकटी ठरवण्याचा काळ म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहिलं जातं. नाथ संप्रदायाचा उदय आणि त्याच व्यापकतेतून आलेली भक्ती जपणार्‍या गोरोबा काकांचे मोजकेच अभंग उपलब्ध असले तरी त्यांना थापटी मारून ते तत्त्वज्ञान तपासण्याचा अधिकार होता.

याचा अर्थ तेर आजही केंद्रस्थानी नाही, असं नाही. नव्या राजकीय चौकटीमध्ये तेरचेच डॉ. पद्मसिंह पाटील यांनी मोठ्या पदांवर काम केलंय. त्यामुळं एक पत्रकार म्हणून तेरमध्ये कितीवेळा जावं लागलं, हे मोजलं नाही. पण बाहुबली अशी प्रतिमा असणार्‍या डॉ. पद्मसिंह यांच्या तेर या गावी विरोधी पक्षातील व्यक्तींची सभा होणं याला एक वेगळंच महत्त्व असे. तेरच्या जवळ गोवर्धनवाडीमध्ये पवन राजे निंबाळकरांचं घर होतं. त्यांचा खून झाला. त्यानंतरही अनेकदा तेरच्या परिसरात फिरताना इथल्या अनेक लोकांशी संपर्क आला. त्या काळचं वैभव वगैरे संकल्पनांवर विश्वास बसणार नाही एवढी अनास्था इथं आजही आहे. गोरोबा काकांच्या दर्शनाला जायचं. फार तर वारीमध्ये जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, अशी इच्छा असणारे बहुतेक जण. याच परिसरात नंतर एक साखर कारखाना झाला. त्यामुळं काही दिवस समृद्धीचे होते. पण जसजसे दुष्काळ येत गेले. तसतसा ऊस कमी होत गेला. पण आजही तेर आणि या गावाचा भवताल मोठा अभ्यासण्यासारखा आहे.

अनेक भटक्यांच्या वस्त्या आजही गावाभोवती असतात. पारधी, कैकाडी, वडार समाजातील अनेकांच्या वस्त्या आहेत. त्यांच्या जगण्याच्या वेगवेगळ्या चालीरिती आहेत. पण तेर हे सदासर्वकाळ केंद्रस्थानी राहिलेलं गाव आहे. कधी ते सातवाहनांचं म्हणून, कधी ते गोरोबा काकांचं गाव म्हणून तर कधी पद्मसिंहांचं म्हणून. राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या गावातून पूर्वी होत. अनेक वर्ष हीच स्थिती कायम होती. अजूनही त्यात फार बदल झाले आहेत, असं नाही. उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीतील अनेक निर्णय आजही याच गावाच्या भोवताली ठरतात. आज घडीला तेर तसं छोटसं असलं तरी त्याचा इतिहास जरी नीट मांडला तरी बरंच काही होईल. गोरोबांचं हे ग्लोबल गाव जगाच्या नकाशावर पुन्हा एकदा येऊ शकेल.

0 Shares
युरेका, युरेका टोपलीतला नैवेद्य आणि पालखीचा आडमार्ग