गोरोबांचा महाराष्ट्रधर्म

महेश म्हात्रे

तेरा आकडा अशुभ मानला जातो. पण तेराव्या शतकानं महाराष्ट्राच्या मनावर असंख्य शुभसंस्कारांची उधळण केली. एकीकडं आक्रमणांनी धर्मसत्ता आणि राजसत्ता खिळखिळ्या होत होत्या. दुसरीकडं सत्ताहीन सामान्य कुटुंबातील गोरोबांसारखी एकाहून एक असामान्य व्यक्तिमत्त्वं आकारास येत होती.

संत हा गोराजुनाट पै जुने।
हाती थापटणेअनभुवाचे॥
परब्रह्म म्हातारा निवाला अंतरी ।
वैराग्याच्या वरी पाल्हाळला ॥
सोहं शब्द विरक्ती डवरली अंतरी ।
पाहता अंबरी अनुभव ॥
म्हणे मुक्ताबाईघालूयालोटांगण ।
जाऊ द्या शरण अव्यक्ताशी ॥

योगविद्येत पारंगत असणार्‍या, दीर्घायुशी, तपस्वी चांगदेवांची‘कोरा कागद’ म्हणूनसंभावना करणारी योगिनीमुक्ताई, वयानं, अधिकारानंआणि लौकीकानं थोर असणार्‍या संतनामदेवमहाराजांना फटकळपणे‘कारे अहंकारगेला नाही?’, असा जाब विचारणारी आदिशक्ती मुक्ताई, जेव्हागोरोबा कुंभारांनासगळ्यांसमोर‘संत’ म्हणते, अगदी लोटांगण घालायला सिद्ध होते, त्यावरून समकालीन अध्यात्मक्षेत्रात, संतमंडळीत संतगोरा कुंभारांबद्दल किती आदराची भावना होती, हेजाणवतं.काकांच्या विलक्षण आयुष्याचेजे थोडेफारतुकडेत्यांच्यावरील अभंगांतून, कथा, दंतकथांमधून दिसतात ते त्यांची जडणघडण दर्शवतात आणि मग कळतं की हा मुक्ताबाईंच्याअभंगांतून झळकणारा आदरभाव अन्य कशातूननिर्माण झाला नव्हता, तर त्याला कारणीभूतहोती, गोरोबाकाकांची निस्सीम विठ्ठलभक्ती, आत्मज्ञानाची तळमळ, उन्नत आध्यात्मिक वृत्ती आणि उक्ती, तशी कृती.

गोरोबांच्या याच सद्गुणांमुळे मानवी जीवनाचा अर्थ त्यांच्यासमोर सहजपणेउलगडत गेला असावा. परिणामी, त्यांचा परमार्थसोपा झाला. मग अशा साधपेणानंसाधना करून जीवनध्येय साधणार्‍या माणसाला भक्तीचंजिवंत रूप असणारेनामदेव आणि ज्ञानयोगाची चालतीबोलती मूर्ती असणारेज्ञानदेव या दोन्हीसंतशिरोमणींनी ‘काका’ म्हणून नमस्कार केला, तर नवल काय? पण मला मात्र वारक-यांनी आणि उभ्या महाराष्ट्रानंया ‘जुनाट पै जुन्या’ संताकडंखरंतर विचारवंताकडंका पाठ फिरवली, याचंचराहूनराहून आश्चर्य वाटतं. कदाचित त्याचमुळं मला तुकोबांएवढेचगोरोबापण आकर्षित करतात. मग सुरू होतो विचारांचा कल्लोळ.

संत नामदेवज्यांच्याबद्दल ‘वैराग्याचा मेरू’ अशा शब्दांत व्यक्त होतात, तो माणूस कसा घडला असेल? मातीत राबणारं, गाडगी मडकी घडवणारं, भट्टीजवळ चटके खाणारं त्याचं शरीर दिवसभराच्या परिश्रमानंतर थकलेल्या मनाला आध्यात्मिक वाटेवर कसंपुढं नेले असेल? आज जेकाही त्यांचे वीस-बावीस अभंग आपल्या हाती लागलेआहेत, त्यातील चमकदार शब्द, अनुपम्य उपमा आणि साधनेची, साक्षात्काराची साक्ष देणारी शब्दकळा पाहिल्यानंतर मन आश्चर्यानं थक्क होतं.

गोरोबाकाकांचा जन्म मराठवाड्यातल्या तेर गावचा. तेरणेच्या काठावर वसलेल्यातेरचा इसवी सनाच्या पहिल्या शतकात जगाशी संपर्कहोता. सातवाहन, गुप्त, चालुक्य अशा विविध राजघराण्यांसहहिंदू,बौद्ध आणि जैनसंस्कृतीचासंगमझालेल्या या समृद्ध वारसा मिरवणार्‍या नगरात तेराव्या शतकात गोरोबा वावरले.त्यांचाकालखंड हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाला दिशादिग्दर्शन करणारा कालखंड ठरला. जगात तेरा आकडा अशुभ मानणारे खूपलोक असतील; पण तेराव्या शतकानंमहाराष्ट्राच्या मनावर असंख्यशुभसंस्कारांची उधळण केली, हेनिश्चित. एकीकडेइस्लामिक आक्रमणांनीधर्मसत्ता आणि राजसत्ता खिळखिळ्या होतहोत्या. पण दुसरीकडं सत्ताहीन सामान्य कुटुंबातील नामदेव, ज्ञानदेव, चक्रधर, गोरोबा, सावता माळी, चोखामेळा, जनाबाई, कर्ममेळा, सोयराबाई, कान्होपात्रा, माणकोजीबोधला, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाईअशी एकाहून एक असामान्य व्यक्तिमत्त्वं आकारास येतहोती. त्यांच्याप्रबोधनकारी वर्तनातूनलोकसत्ताक विचारांची ठिणगी सह्याद्रीच्या रानावनात बंडाचा वणवा पसरवत गेली.

ज्ञानाचा सूर्य असणार्‍या ज्ञानेश्वरांनीसंस्कृतच्या जोखडातूनधर्मज्ञानमोकळं करून माय मराठीत आणलंहेएक मोठं बंडहोतं, ते तिथंचथांबलं नाही. ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’असा सर्वांसाठीसुखाची मागणी करणारा हुंकारही त्यांनी केला, तर भक्तीचंद्र नामदेवरायांनी‘ज्ञानदीप लावूजगी’चा उद्धार करत अठरापगड जातीच्या लोकांना ज्ञानाच्या प्रगतीपथावर नेण्याचाचंगबांधलाहोता. त्याच्या थोडं आधी मराठीला धर्मभाषा करणार्‍या सर्वज्ञ चक्रधरांनी महानुभव पंथाला आकार देताना जातीभेदझुगारले आणि स्त्री-पुरुष समानतेचं पर्व सुरू केलं.जनाबाईनं तर ‘स्त्रीजन्मा आलेम्हणवूनि न व्हावेउदास’ असा दिलासा काळोख्यास्वयंपाकघरात कोंडलेल्या लक्षावधी आयाबायांनातेराव्या शतकातच दिला.

आत्ताच्या भाषेतसांगायचं तर हे तेरावंशतक महाराष्ट्राच्या आणि मराठी समाजाच्या वाटचालीतील महत्त्वाचा ‘टर्निंगपॉईंट’ होता. कारण या शतकानं कर्नाटकातील लिंगायत, गुजराती चक्रधरांचा महानुभव आणि वारक-यांच्या भागवत संप्रदायांचीवैचारिक घुसळण आपल्या महाराष्ट्रदेशीअनुभवली. ज्या काळात जातीभेदाचेतट अभेद्य झाले होते. राजा रामदेवरायाच्या पदरी असणार्‍या हेमाद्रीपंडिताच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’नं बहुजन समाजात कर्मकांडं, नाना प्रकारचीव्रतवैकल्य आदींची दांभिक लागण साथीच्या रोगासारखी पसरवली होती. असंख्यदेवता, अफाट संप्रदाय आणि बाह्य अवडंबरानंसमाजात एक प्रकारे धार्मिकअनागोंदीमाजलेलीहोती. ज्याचा सगळ्यात जास्त फटका स्त्रिया आणि सर्वचक्षेत्रात मागासलेल्यागोरगरिबांना बसत होता. विशेषतः वामाचारी मार्गाचापुरस्कार करणार्‍या तंत्रमार्गाच्या‘तंत्रानं’ महाराष्ट्राचंझालंहोतं.

अशा वातावरणात महात्मा बसवश्वेरांनी आपल्या रचनांद्वारेलोकजागृती-लोकशिक्षणाचंकाम केलं.त्यांच्या‘काया कवे कैलास’ या एका तत्त्वानंसामाजिक क्रांतीचं शिंग फुंकलं. राजकीय हत्यार चालवून ती सामाजिक मन्वंतराची सुरुवात रोखण्याचा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला होता. पण वाईट प्रथा आणि चुकीच्या परंपरांविषयीबंड करताना संतज्ञानेश्वर आणि सर्वज्ञ चक्रधर या दोघांसाठी खरंतर बसवश्वेरांचीकारकीर्द ‘मार्गदर्शन’ करणारी होती. तसंपाहायला गेल्यास बसवश्वेरांनी जातीभेदनिर्मूलनासाठी आंतरजातीय सहभोजन आणि आंतरजातीय विवाह अशी क्रांतिकारक पावलं उचलण्यानंप्रस्थापित राजसत्ता आणि धर्मसत्तेचारोषओढवूनघेतला होता.

चक्रधरांनी तसा रोष आपल्या माथी येऊ नये, असा प्रयत्न करूनही त्यांच्यावेदप्रामाण्य नाकारण्याच्या, जातीभेदसंपवण्याच्या प्रयत्नाचेपरिणाम त्यांच्याहत्येत झाले. हेजसंत्यांचे अनुयायी विसरलेतसं महाराष्ट्रही विसरला, मराठी भाषा अगदी काबुल, कंदाहारपर्यंतमोठ्या मानाने नेणारा हा महामानव बसवश्वेरांसारखाच विवेकवादी होता. पण आपण त्यांना पचवूशकलो नाही. त्यामुळं आमच्या असंख्य पिढ्या वाचवूशकलो नाही.

या दोघाबंडवाल्यांच्याअनुभवातून‘धडा’ घेत निवृत्ती-ज्ञानेश्वरांनी वारकरी सप्रंदायाची वैचारिक बैठक ‘सौम्य’ केली. मुख्य म्हणजेज्याप्रमाणेमहात्मा बसवश्वेर आणि सर्वज्ञ चक्रधर धार्मिकतेसोबत व्यावहारिक, इहवादी दृष्टिकोनमांडत बदलाचा आग्रह धरत होते. त्याच्या उलट ज्ञानदेव प्रत्यक्ष व्यवहारापेक्षा आध्यात्मिक आणि भक्तीप्रधान कर्मयोगाचापुरस्कार करत होते.

अगा जेजयाचेविहित । ते ईश्वराचे मनोगत ॥
म्हणोनि केलिया निभ्रांत । सापडेचितो ॥

अशा शब्दांत प्रत्येकाने आपलंजातीनुसार विहित कर्म करत राहावं. कारण ते ईश्वराचं मनोगत आहे, असं मानून काम करत राहिल्यास देवभेटतो, असंज्ञानोबासांगतात. इतकंच नाही तर ज्ञानेश्वर राजसत्तेशीजवळीकतेचे संबंध उघडपणे दाखवण्यास अजिबात लाजत नाहीत. तत्कालीन राजा रामदेवराय याची स्ततुी करणारी ओवीज्ञानेश्वरीच्या अखेरीस पाहायला मिळते.

तेथयदुवंशविलासू। जो सकळकलानिवासू॥
न्यायाते पोषी क्षितीषू। श्रीरामचंद्र ॥

अशा शब्दफुलांनी तेकपटानंराजा बनलेल्या, राजधर्म न जाणणार्‍या, दुबळ्या आणि स्वार्थी रामदेवरायाची स्तुती करतात. राजसत्तेची आपल्यावर वक्रदृष्टी होऊ नयेयासाठी त्यांची ही धडपड होती,असं संशोधकांनी मानलंतर त्यात गैर काही नाही. फक्त ज्ञानेश्वर माऊलीच नाही, तर त्यांच्याबरोबरीचे सगळेचसंत एकापरीनंसावध आणि दक्ष होते. त्यांनीतुकाराम महाराजांसारखा थोडा धोका पत्करला असता आणि वारकरी संप्रदायाच्या या आध्यात्मिक क्रांतीला सामाजिक अधिष्ठान दिलं असतं, तर कदाचित महाराष्ट्रात समाजसुधारणेची सुरुवात तेराव्या शतकातच झाली असती. तरीही महार, माळी, शिंपी, सोनार, कोळी, कुंभार असे जातीबद्ध विहित कर्माच्या चौकटीत बंदिस्त असणारे गुलामथेटमोक्षाची आस धरू लागलेहा साधा परिणाम नव्हता. जनाबाई, कान्होपात्रा, गोणाई, राजाईआदी स्त्रीसंतांनी मुक्तीचा माग प्रशस्त केला. पिढ्यान पिढ्या लौकिक शिक्षणापासून, ज्ञानसंपादनापासून आणि धार्मिक, आध्यात्मिक उन्नतीपासूनदुरावलेला बहुजन समाज संतांच्या संगतीनं गतीप्रवण झाला. कामाला लागला. चोखोबांच्या अस्थींना पंढरपुरात मानाची जागा देऊन नामदेवांनी सामाजिक उन्नयनाची आशा आणि दिशा दाखवली.

गोरोबाकाकांनी या सगळ्यांवर कडी करत आध्यात्मिक उन्नतीचंशिखर सर करून लोकांना सन्मार्ग दाखवला. थापटणं हाती घेणार्‍या काकांनी भक्तीप्रवण नामदेवांनायोगप्रवण निर्गुणसाधनेच्या अवघड वाटेवर अगदी हाताला धरून नेलं. खरं सांगायचं तर आजच्या संदर्भामध्ये गोरोबाकाका असो वा चोखामेळा, जातीय उतरंडीमध्ये पार मागंअसलेल्या समाजघटकातील मंडळींच्या काव्यरचना आश्चर्यचकित करतात. निवृत्ती ज्ञानेश्वरादी भावंडांचं जगणंआणि अगदी अल्पवयात चारही भावंडांचं समाधिस्त होणं, त्यापाठोपाठ नामदेवांचं अकस्मात पंजाबच्या दिशेला जाणंआणि अगदी लगेचच गोरोबांनी पन्नासाव्या वर्षी समाधी घेण्याचा निर्णय करणंया आणि अशा अनेक घटना, गोष्टी चक्रावून टाकणार्‍या आहेत. या अकस्मात घडलेल्या घटनाक्रमांवरजेव्हा बसवेश्वर-चक्रधर यांच्या मागे येणार्‍या धर्म-राजसत्तेची सावली पडते तेव्हा मन गोंधळूनजातं. आजही या आणि अशा सगळ्या घटनाक्रमांची कारणंआपल्याला ठाऊक नाहीत. इतिहासात त्याबद्दल काहीच उल्लेख नाही. मग यावर कधीतरी प्रकाशझोत पडला पाहिजेना?

कर्मठांनी फक्त विचार करणार्‍या आणि मांडणा-यांनाच संपवलंअसंनाही, आजही ज्याप्रमाणं दुसर्‍याची फेसबुक वा व्हॉट्सअॅपपोस्ट नाववा संदर्भबदलूनफॉरवर्ड केली जाते, तशीच अफवा पसरवून माणसंमारणारी मनोवृत्ती इतिहासामध्येठिकठिकाणी दिसते.त्यामुळं असेल कदाचित संतांचं विचारवाङमय काळाच्या ओघात ठरवूनहरवून टाकलेलं दिसतं. आज गोरोबाकाकांच्या नावावर केवळ वीस, बावीस अभंग दिसतात. त्यांच्यावरील नाटक, चित्रपटातसुद्धात्यांच्यातोंडी दुसऱ्याचं काव्य टाकण्याचंधाडस झालंय. त्यांचीजयंती-पुण्यतिथी फक्त कुंभार जातीतील लोकच साजरी करतात. त्यासाठी शक्यतो कुंभार समाजातील कीर्तनकारबुवाची निवड केली जाते.त्यांच्या कीर्तनाला कुंभार मंडळीच जास्त गर्दी करतात.

अन्य वेळीगोरा कुंभार, जनाबाईआदी संत वारकरी विचारपीठावर उपेक्षिले जातात. संतज्ञानेश्वर आणि संततुकाराम यांचे पाठशाळेत शिकवलेले सोपे, मनोरंजक आणि ठरलेले अभंगघेऊन स्वतःचंसंस्कृतपांडित्य आणि इंग्रजीवरील नसनसलेलं प्रभुत्व दाखवणारे बुवा, महाराज आजकाल जागोजागीफोफावलेत. ते तुकारामांची निष्काम वृत्तीकीर्तनातूनसांगतील, पण त्यांची नजर बिदागीवरच असते. ते ज्ञानेशांच्याओव्यांमधील आत्मज्ञान फेसाळ शब्दांच्याबुडबुड्यांसह दाखवतील. मात्र तिथं अनुभूतीचाओलावाच नसतो.त्यांचं बाह्य अवडंबर आणि पदव्यांची मालिका. कुणी गीताचार्य, कुणी महंत, कुणी शास्त्री तर कुणी शब्दप्रभू. काय त्यांचे कपडे, दागिने, गाड्या, भक्तमंडळाचामेळा, अहाहा! वरून कीर्तन पण आतून काय?

आपल्याला आतून, होय अगदी अंतर्बाह्य बदलायचंअसेल ना तर वारकरी संतांच्या शिकवणुकीच्या गाभ्यापर्यंतगेले पाहिजे. वारकरी तत्त्वज्ञानाचा सागर खोल, गहन आहे. त्याच्या तळाशी गोरोबा, चोखोबा, जनाई, राजाईआदी दुर्लक्षितसंतांचे शब्दमोती पडलेत. स्वतःला अनुभवाच्या शिंपल्यात कोंडूनघेऊन या मायबापांनीहे समृद्ध विचारधन निर्माण केलं. जरा खोलातगेलात तर, ज्ञानोबा-तुकोबांचं बावनकशी सोन्याचं अनभुवतत्त्व उपेक्षेच्यागर्तेत पडून असलेलं दिसतं. पण बोलायचंकुणाला? या विचारवारशाची पर्वाआहे कुणाला?

सध्याच्या धकाधकीच्या काळात लोकांचंजगणं गतिमान, पर्यायानं दगदगीचं झालंय. घरीदारी तणावाचेतण इतके वाढलेआहेत की, लोकांचे जीवनमार्ग चकवे देतात. अगदी कं-स्वयंघोषितसंत असो वा गुन्हेगारांचाकर्दनकाळ ठरलेले बलदंडपोलीस, त्यांनासुद्धा तणावाचा ताण असह्य होऊन त्यांचा प्राण जातो.घरोघरीच्या भावविश्वाला अविश्वासाची जहरी मिठी पडलेली दिसतेय. अशावेळी स्वतःला, पर्यायानंकुटुंबाला वाचवायचंअसेल तर जनीमावशी किंवा गोरोबाकाकांच्यामांडीवरखुशालडोकं ठेवावं आणि त्यांचं म्हणणं ऐकावं.

गोरोबाकाका एकीकडंअगदी सोप्या शब्दात स्वतःचं मडकं, डोकं घडवण्याची जीवनविद्या हाती देतात, तर दुसरीकडंविलक्षण रसाळ, चमकदार, भावस्पर्शी शब्दप्रतिमांचीपेरणी करत अवघड अध्यात्म वाट सहज सुलभ करतात.

निर्गुणाचेभेटी आलो सगुणासंगे।
तव झालो प्रसंगी । गुणातीत ॥

गोरोबाकाकांचा हा आणि असेकिमान डझनभर अभंगत्यांच्या आध्यात्मिक अनुभूतीचं गूढ उलगडून सांगणारे आहेत. दुर्दैवानं त्यातला खरा अर्थसमजूनघेण्यात जितका वारकरी परंपरा मानणारा बहुजनवर्ग कमी पडला. तितकाच ज्ञानलालसेचातोरा दाखवणारा अभिजनवर्गहीतोकडा पडलाय. याची चर्चाकधीतरी झाली पाहिजे. तसंझाल्यास किमान संतांच्या वाङमयाभोवती तत्त्वविचारांवरजो दंतकथांचा जाड थर चढलाय, तो तरी कमी होईल. मग सिनेमा असो वा नाटक, टीव्ही सीरिअल असो, फेसबकु पोस्ट यामधील भाकडकथा कमी होऊन संतविचारांचं सोनं उजळेल. त्यासोबतसंतवाणी ‘शुद्ध’ करण्याऐवजी तिला ‘अशुद्ध’ करण्याचा जो शहरी, सुशिक्षितांचा प्रयत्न किंवा प्रमाद आहे,तो सुद्धा थांबेल.

‘निर्गुणाचेभेटी आलो सगुणासंगे।’ हा अभंगसंगीतबद्ध करताना पंडित यशवंतदेवतो रामदास कामतांना‘निर्गुनाभेटी । आलो सगुनासंगे’ असा गायला सांगतात. कारण काय असेल त्याचं?साधंसोपं तरीही रसदार, डौलदार शब्द वापरून आपली आत्मानुभूतीलयपूर्ण शैलीतमांडणार्‍या गोरोबांनात्यांनीच लिहिलेला‘ण’ उच्चारता येत नसेल, असा फाजील अभिनिवेश टाळणं तेव्हाच शक्य असतं,जेव्हा शब्द आणि त्यामागील आर्तभाव कळतात; अन्यथा गोरोबाकाकांच्या शब्दात सांगायचं तर, ‘झाला बाईकाईबोलू नये’.

राजकीयदृष्ट्या अस्थिर अशा तेराव्या शतकात वायफळ, दंभयुक्तकर्मकांडातबुडालेल्या समाजाला सहजसोपी साधना सांगताना ज्ञानदेव-नामदेवादी संतांनी नामस्मरणाचा अगदी स्वस्त, मस्त आणि टिकाऊ उपाय सांगितला. आणि तो आमच्या कित्येकपिढ्यांनी प्राणपणानंजपला. संतविचारांची मशागत झाल्यानंमहाराष्ट्रदेशी फुले-शाहू-आंबेडकर-कर्वे-आगरकर असे क्रांतदर्शी समाजसुधारक झाले, पण आजचा महाराष्ट्र या सगळ्या संतांना, महापुरुषांना जातीच्या भिंतीत, देवत्वाच्या तसबिरीत अडकवूनमोकळा झालाय. आम्हाला त्यांचे विचार नकोत, कारण विचार करायला वेळ कुणाकडं आहे?

सुमारे सहा महिन्यांपूर्वी माझेपत्रकार मित्र अभय देशपांडेयांच्याआग्रहावरून कळंबला पत्रकार संघटनेच्याकार्यक्रमाला गेलो होतो.रेल्वेतून उतरल्यापासूनगोरोबाकाकांचे शब्द मनात रुंजी घालत होते.‘निर्गुणाचा संग । धरीला जो आवडी ॥ तेणेकेले देशोधडी । आपणाशी ॥’ निर्गुण निराकाराच्या साधनेनं मनाला अशी काय भूरळ पाडलीय की या लौकिक जगातून मन बाहेरपडलंय. अक्षरशः देशोधडीला लागलंआहे, असं गोरोबाकाका इतक्या सहजपणेकसं लिहूनगेले असतील? त्यांना ज्यावेळी विरक्ती आली, घर-संसार, कामधाम सोडून ते जेव्हा विठ्ठल नामाच्या मस्तीत दंग झाले होते,तेव्हालोकांनी काय कमी टोमणे मारलेअसतील? एका सामान्य कुंभारानं असामान्यत्व मिळवण्यासाठी किती अग्निदिव्यंपार पाडली असतील? सगळ्या संतांच्या डोक्यावर थापटणंहाणताना निर्मळ मनाच्या प्रेमळकाकांचा हात निश्चितच थरथरला असेल. एक ना अनेक विचार डोक्यात‘ज्ञानोबा-तुकाराम’ करत रिंगण घालत होते.

कार्यक्रमसंपवून परतीच्या वाटेवरतेरला गोरोबाकाकांना कधी भेटतोय, असंझालं होतं.कालेश्वर मंदिराच्या शेजारीगोरोबाकाकांची समाधी आहे. रात्रीचेआठ वाजलेअसतील. तेरणेच्या काठावरील मंदिर वर्दळ नसल्यानंशातं होतं. नाही म्हणायला मंदिराबाहेर हरिनाम सप्ताह सुरू असल्यानं टाळ-मृदुंगाचा दणदणीत आवाज शांततेला चरेपाडत होता. एक वारकरी बुवा आम्हाला मंदिरात घेऊन गेले. मला आणि अभयला गोरोबाकाकांच्या समाधी शेजारी बसवलं, मग ते बुवा समाधीविषयी माहिती सांगू लागले, ते ऐकण्याऐवजी माझ्या मनात ‘निर्गुणाचेभेटी आलो सगुणासंगे।’ची धून सुरू. उठताना हात समाधीवर ठेवले. मग मस्तक ठेवलं.सातशे वर्षांपूर्वी थापटणंहातात घेऊन उभंराहणार्‍या ‘जुनाट पै जुन्या’ माणसासमोर आपण तेवढं ठेवायला काय हरकत आहे.गोरोबाकाका भलेही समाधिस्त झालेअसतील, पण त्यांचे शब्द आहेत ना अभंग, अक्षर आणि अमर!

0 Shares
माटी कहे कुम्हारसे गोरोबा : एक मुक्तचिंतन