संत गोरा कुंभार अभंगगाथा

Ringan

गोरोबांचे सध्या उपलब्ध असणारे हे २३ अभंग.

केशवाचे ध्यान धरोनी अंतरी ।
मृतिके माझारी नाचतसे ॥
विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा ।
नेत्री वाहे जळ सद्गदित ॥
कुलालाचे वंशी जन्मले शरीर ।
तो गोरा कुंभार हरिभक्ता ॥
———————————–
वरती करा कर दोन्ही ।
पताकाचे अनुसंधानी ॥
सर्व हस्त करिती वरी ।
गोरा लाजला अंतरी ॥
नामा म्हणे गोरोबासी ।
वरती करावे हस्ताशी ॥
गोरा थोर वरती करी ।
हस्त फुटले वरचेवरी ॥
——————————–
निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणे केले देशधडी आपणासी ॥
अनेकत्व नेले अनेकत्व नेले ।
एकले सांडले निरंजनी ॥
एकत्र पाहता अवघेचि लटिके ।
जे पाहे तितुके रुप तुझे ॥
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेवा ।
तुम्हा आम्हा नाव कैचे कोण ॥
———————————–
अंतरीचे गुज बोलू ऐसे काही ।
वर्ण व्यक्त नाही शब्द शून्य ॥
जय जय झनकूट, जय जय झनकूट ।
अनुहात जंगट नाद गर्जे ॥
परतल्या श्रुति म्हणती नेती नेती ।
त्याही नादा अंती स्थिर राहे ॥
म्हणे गोरा कुंभार सत्रावीचे नीर ।
सेवा निरंतर नामदेवा ॥
———————————
ऐकमेकामाजी भाव एकविध ।
असे एक बोध भेदरहित ॥
तू मज ओळखी तू मज ओळखी ।
मी तुज देखत आत्मवस्तू ॥
आत्मवस्तू देही बोलता लाज वाटे ।
अखंडता बिघडे स्वरुपाची ॥
म्हणे गोरा कुंभार अनुभवाचा ठेवा ।
प्रत्यक्ष नामदेवा भेटलासी ॥
—————————
सरितेचा ओघ सागली आटला ।
विदेही भेटला मनामन ॥
कवणाते सांगावे पुसावया कवणाते ।
सांगतो ऐक ते तेथे कैचे ॥
नाही दिवसराती नाही कूळ याती ।
नाही माया भ्रांती आघवेची ॥
म्हणे गोरा कुंभार परियेसी नामदेवा ।
सापडला ठेवा विश्रांतीचा ॥
————————————
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे ।
तव झालो प्रसंगी गुणातीत ॥
मजरूप नाही नाव सांगू काई ।
झाला बाई काई बोलू नये ॥
बोलता आपली जिव्हा पै खादली ।
खेचरी लागली पाहता पाहता ॥
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझ्या भेटी ।
सुखासुखी मिठी पडली कैसी ॥
————————————
कैसे बोलणे कैसे चालणे ।
प्ररब्रह्मी राहणे अरे नाम्या ॥
जेवी त्याची खूण वाढीतांचि जाणे ।
येरा लाजिरवाणे अरे नाम्या ॥
म्हणे गोरा कुंभार अनुभावित जाणे ।
आम्हाते राशी राहणे असे नाम्या ॥
—————————————-
मुकिया साखर चाखावया दिधली ।
बोलता हे बोली बोलवेना ॥
तो काय शब्द खुंटला संवाद ।
आपुला आनंद आधाराया ॥
आनंदी आनंद गिळूनी राहणे ।
अखंडीत होणे न होतिया ॥
म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे ।
जग हे करणे शहाणे बापा ॥
————————————-
कवण स्तुती करु कवणिया वाचे ।
ओघ संकल्पाचे गिळले चित्त ॥
मन हे झाले एक मन हे झाले एक ।
अनुभवाचे हे सुख हेलावले ॥
दृष्टीचे पाहणे परतले मागुती ।
राहिली निवांत नेत्रपांती ॥
म्हणे गोरा कुंभार मौन्य सुख घ्यावे ।
जीवें ओवाळावे नामयासी ॥
————————————
काया वाचा मन एकविध करी ।
एक देह धरी नित्य सुख ॥
अनेकत्व सांडी अनेकत्व सांडी ।

0 Shares
गोरोबांच्या संदर्भखुणा संपादकीय