निर्गुणाचे रूपडे सगुणाचे

ज्ञानेश्वर भोसले

संत गोरा कुंभारांचे अभंग वाचताना त्यातलं सगुण-निर्गुणावरचं चिंतन लक्ष वेधून घेतं. परंपरा सांगते तसा सगुण आणि निर्गुणामध्ये झगडा नाही. उलट या दोन्ही संकल्पना एकमेकांशी संवादीच आहेत. त्यातच भक्तीचं अधिष्ठानही आहे. हे गोरोबा रसाळपणे समजावून सांगतात.

संतगोरा कुंभार म्हणजे वारकऱ्यांचे संतगोरोबा काका. त्यांची काका ही उपाधी त्यांचीज्येष्ठतासूचीत करते.त्यांनीसंतनामदेवांनागुरू मानलंअसलं, तरी त्यांनीचनामदेवांना कच्चंठरवल्याचा उल्लेखत्यांच्या चरित्रामध्ये सापडतो. सकलसंतगाथेमध्ये त्यांचे एकूण २०अभंगआहेत. त्यामध्ये सगुण-निर्गुण या संकल्पनांचे संदर्भतीनअभंगांमध्येआलेलेआहेत. त्यांचीसगुण-निर्गुण अस्तित्वाबद्दलची भावना ही वारकरी परंपरेची प्रतिनिधी मानता येईल.

सगुण आणि निर्गुण ही संकल्पना वारकऱ्यांच्या आराधनेच्या, उपासनेच्या केंद्रस्थानी आहे.सगुण, निर्गुण या शब्दांमधील‘स’ तसंच‘निर’ हेप्रत्यय अनुक्रमे सकारात्मक आणि नकारात्मक आहेत. गुणाचं अस्तित्व सगुण शब्दात आहे, तर निर्गुणामध्येगुणाचं अस्तित्व नाकारलंय. यातूनपुढंयेणारी गुणातीत अवस्था हे वारकऱ्यांनी आपलं अंतिम साध्य मानलंय. त्यासाठी त्यांनीविठ्ठलाला या दोन्ही रूपांत मांडलंय. सगुण विठ्ठल आणि त्याचंतत्त्वत: निर्गुण रूप हेवारकर्‍यांच्याआकर्षणाचं साधनेचं केंद्र आहे.सगुण उपासनेतूनचत्यांना निर्गुण उपासनेची उपलब्धी होते. विठ्ठलाला त्यांनीसगुण आणि निर्गुण अशा दोन्हीरूपांमध्ये पाहिलंय.

आद्य शंकराचार्यांनी प्रामुख्यानं निर्गुण उपासनेला आपल्या तत्त्वज्ञानामध्येस्थान दिलं होतं. पण त्यांनीसगुण उपासना पूर्णपणे नाकारलीही नव्हती. त्यांच्या‘पांडूरंगाष्टक’ या स्तोत्रामधून त्यांची सगुणउपासनेबद्दलची आस्था लक्षात येते.शंकराचार्यांचीसगुण-निर्गुणसंकल्पनाज्ञानेश्वरांनी स्वीकारलेली दिसते.परंतु ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानामध्ये निर्गुण उपासनेपेक्षासगुणउपासनेला महत्त्वाचंस्थान आहे. पण त्यांनी अन्य वारकरी संतांच्यातुलनेत व्यक्तिश: निर्गुण उपासनेवरच जास्त भर दिलाय. त्यापेक्षा नामदेवांनी मात्र निर्गुण उपासना बाजूला सारून सगुण उपासना प्रामुख्यानं स्वीकारली होती. संतगोरा कुंभार यांच्यावर या बाबतीत नामदेवांचा जास्त प्रभाव दिसूनयेतो. या दोघांच्याही भूमिकांचा संगमसंतगोराकुंभारांच्यासगुण, निर्गुणाविषयीच्या अभंगांतून आढळतो. तेम्हणतात,

निर्गुणाचासांग धरिला जो आवडी ।
तेणे केलें देशधडी आपणासी ॥
अनेकत्व नेलेंअनेकत्व नेलें।
एकलें सांडिलेंनिरंजनीं ॥
एकत्व पाहतांअवघेंची लटिकें ।
जेंपाहेंतितुकें रूप तुझें॥
म्हणे गोरा कुंभार ऐका नामदेवा ।
तुम्हा आम्हा नांव कैंचे कोण ॥

याअभंगांतूनगोरोबांनीनामदेवांसमोर आपली निर्गुण भावना व्यक्त केलीय. निर्गुण उपासनेला उपलब्ध झालेला साधक हा आकारातीत होतो. त्याला या लौकीक विश्वातूनदूरगेल्याची जाणीव होते. पाण्याचा थेंब सागरात मिसळून जावा, त्याप्रमाणं तो समग्र अस्तित्वाशी तादात्म्य पावतो, त्याच्याशी एकरूप होतो,तोचअनुभव इथंपहिल्या चरणात मांडलाय. या निर्गुणअवस्थेची आणखी एक पुढची पायरी म्हणजे एकत्वासोबतच अनेकत्वाचा नाश. अनेकत्वासोबतच एकत्वाचा नाश ही खरी निर्गुणाची उपलब्धी आहे. त्या निर्गुणाच्याअवस्थेलानिरंजन हेनाव आहे. निरंजनी हा एक प्रतीकात्मक शब्द आहे. प्रकाशमय अस्तित्वाशी एकरूपता असा त्याचा सूचीतअर्थ आहे.‘निरंजनी आम्ही बांधियले घर ।’ असे संततुकारामदेखील म्हणतात. अनेकत्वाचा नाश होऊन, एकत्व नष्ट करून त्या निरंजनी अवस्थेला मी प्राप्त झालो, असा भाव इथं दुसर्‍या चरणातून व्यक्त होतो.

अशा अवस्थेतून जगाकडेपाहिलंकी, आकारमय जग हेलटिके वाटायला लागतं.यातून आकारभेदमावळूनगुरू नामदेव आणि आपण एकच असल्याचा भाव अभंगाच्याशेवटीगोरोबांनी व्यक्त केला आहे.निर्गुण उपासना ही सगुण उपासनेला बाधा आणते, असं यातूनसूचीत करून निर्गुण उपासनाच अंतिम साध्य असल्याची सूचना यातूनगोरोबांनी केल्याचंलक्षात येतं. एकाचा अनेकामध्ये समावेश असा इथं निर्गुणाचाअर्थइथंआहे. आकाराकडून निराकाराकडेअसा प्रवास आहे. इथंएकत्व हा भ्रम असल्याचं सांगून विठ्ठलाच्या रूपातील सगुणरूप मात्र निर्गुणासारखंच आहे, असं त्यांनी सुचवलं आहे.थोडक्यात, विठ्ठलाच्या रूपात सर्वआकार मावळले, असंते म्हणतात. इथं त्यांच्यानिर्गुण संकल्पनेतीलसगुणाच्यामिश्रिततेची छाया दिसूनयेते. विठ्ठलाचा आकार त्यांनानिर्गुणाचा आकार वाटतो, असं यातून ध्यानात घेतायेतं.यातूनच आकाराला दिसणारे सर्वभ्रमअसूनसर्वजण विठ्ठलरूपच असल्याचा भाव त्यांनी नामदेवांसमोरबोलून दाखवला आहे.

‘निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे।’ हा एक गोरोबांचा अधिकार सांगणारा आणि सगुण-निर्गुणाचासंबंधसांगणारा अभंग आहे.सगुण, निर्गुणयातूनगुणातीत झाल्याचा अनुभवयातूनत्यांनी व्यक्त केला आहे.सगुण उपासनेतून आपण निर्गुणअवस्थेलापोचलो, असंइथं सुरुवातीला गोरोबा म्हणतात. गुणातीताला येणारा अनुभवसांगताना आपल्याला रूप आणि नाव नसल्याची जाणीव झालीय. त्याचा अनभुव शब्दात सांगतायेत नाही. त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतानाच आपल्याला विदेहावस्था प्राप्त झाली. हा अनुभवनामदेवांमुळे प्राप्त झाल्याबद्दलची कृतज्ञता आणि कुतूहलही ते व्यक्त करतात. सगुण ही निर्गुणाच्या प्राप्तीची पायरी आहे, असं अनुभवातूनगोरोबासुचवतात. त्याचबरोबर त्या निर्गुणाच्या साक्षात्काराचा अनुभव शब्दातीत असूनतो केवळ अनुभवाचा विषय आहे,निर्गुणाला उपलब्ध झालेला स्वत:ही निर्गुणहोतो, त्याबद्दल त्यालाही काही बोलता येत नाही; परंतु तो अनुभव मात्र आनंददायी आहे.नामदेवांचंसगुण-निर्गुण तत्त्वज्ञान गोरा कुंभारांनीपुढं नेलंय.पुढं एका अभंगात तेम्हणतात,

निर्गुण रूपडे सगुणाचे बंथी ।
विठ्ठल निवृत्तीप्रवृत्ती दिसे॥
एक पुंडलिक जाणे तेथीलपंथ ।
तुझा आम्हांचित्त भाग्य योगें॥
सभाग्य विरळेनामा पाठी गेले।
अभागी ते ठेले मौन्यजप ॥
म्हणे गोरा कुंभार नामया भोगितां।
उरल्या उचिता सेवूं सुखें॥

निर्गुण आणि सगुणयांचासंबंध या अभंगातून स्पष्टपणे मांडलाय. ‘निर्गुणाचे रूप सगुणाच्या साच्यामध्ये बंदिस्तझालं.तेच विठ्ठलरूपानं निवृत्ती-प्रवृत्ती, आसक्ती-निरासक्तीमध्ये दिसतं.पुंडलिकाला एकट्याला या मार्गाची जाण होती, आमच्या दैवानंतो लाभ आम्हाला झाला आहे. भाग्यवान असलेले दुर्लभलोकच या मार्गाला निघाले, अभागी लोक मात्र निरर्थक बडबडीत नष्ट झाले. नामाचा भोगघेत आम्ही उरलेलेआयुष्यसुखानं घालवू’, असा भाव या अभंगातून व्यक्त झाला आहे.

निर्गुण अस्तित्वात सगुण आकाराला आलंआहे, त्याचंच नाव विठ्ठल आहे, असं इथं गोरा कुंभार सांगतात. त्यांच्या दृष्टीनं सगुण हा दृश्यमय असूनतो विठ्ठल आणि नामदेव या दोन रूपांमध्ये त्यांनी स्वीकारलेला दिसतो. या सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा मार्गपुंडलिकानं निर्माणकेल्यामुळे त्याबद्दलची जाणीवही त्यांनी व्यक्त केलीय.

गोरोबांचीसगुण-निर्गुनाची कल्पना ही आजच्या वैज्ञानिक युगात प्रतीकात्मक पातळीवर समजूनघेतायेते. विज्ञानाची अणू-रेणूचीसंकल्पना अभ्यासली, तर लक्षात येतं की, अणू हा आकारमय असला, तरी तो ज्या मूलभूत कणापासूनबनलेला आहे,तो कण मुळात निराकारासारखा आहे.‘बिग बँग थिअरी’तूनशोधलेल्या या मूलभूत कणाला दैवी कण (हिग्स बोसॉन-गॉड पार्टिकल) असंनाव विज्ञानानंदिलं आहे.तो मूलभूत कण हा प्रकाशमय असूनतो आकाररहीत आहे, असंआजचंविज्ञान सांगतं. अशा कणांच्याएकोप्यातून या विश्वाचा आकार निर्माण झाला आहे,हे वैज्ञानिक सत्य सगुण-निर्गुणाच्या कल्पनेचं वास्तव रूप ध्यानात आणूनदेणारं आहे.

मुळात आकार ही एक कल्पना आहे, हेविज्ञानाच्या भाषेतही सिद्ध करता येऊ शकते. आकार हा भम्ररूप आकारांपासून तयार होतो,म्हणूनतो आभास असतो. वारकर्‍यांचा विठ्ठल हा आकाररूप असला, तरी त्याचं मूळ रूप तेनिराकारच मानतात. ‘निर्गुण रूपडेसगुणाचेबंथी’ ही गोरोबांचीओळ या गोष्टीचीपुरती साक्ष देणारी आहे.त्यामुळं ज्ञानी लोक विठ्ठलाला फक्त आकारापुरता मानत नाहीत. ज्ञानेश्वरांपासून नामदेव-एकनाथ-तुकाराम आदी संतांपर्यंत ही भावना जोपासलेली आहे.यातूनसगुणाच्या मूर्तीपूजेतूनहोणाराधार्मिकभ्रष्टाचार रोखण्याचा प्रयत्न अनेक वारकरी संतांनी केलेला दिसतो.

नामदेव हे सगुण विठ्ठलाचेकट्टर उपासक होते.त्यामुळंकाकांनीत्यांनासर्वसंतांच्या यादीमध्येकच्चंठरवलं.काकांकडे एक थापटणं होतं,जे मडक्यावर मारून तेमडकं कच्चंआहे की पक्कं हेतेठरवत होते.मुक्ताबाईंनीकाकांना आपल्या संतांच्यामांदियाळीमध्ये एखादंकच्चंमडकं आहेका, हे तपासायला सांगितलं. तेव्हानामदेवांच्याडोक्यावर तेथापटणं मारून नामदेव कच्चेआहेत, असं गोरा कुंभारांनीसांगितलं.नामदेवांचा विठ्ठलाच्या आकारापुरता असलेलाभ्रमतोडण्याच्या दृष्टीनं गोरोबा काकांची कृती सूचक वाटते.

विठ्ठलाला फक्त आकाररूप मानलंकी, माणूसकर्मकांडामध्ये,लौकिक उपचारामध्येअडकण्याची शक्यता असते.त्यातूनचपुढंदांभिकतानिर्माणहोते.धार्मिकभ्रष्टाचाराला इथूनच खतपाणी मिळतं. त्याचा नायनाट करण्याच्या दृष्टीनंनामदेवांचं निमित्त करून नामदेवांसहसर्वच वारकरी संतांनी जगाला हा संदेश दिलाय. ईश्वरसर्वठिकाणी असूनतो प्रत्येक सजीवामध्येवास करतो.त्यामुळं आपल्या आचरणावर माणसानं नियंत्रणठेवावं. कुणाला त्रास देऊनये. अशी नैतिकता वारकरी संतांनी सांगितलीय. त्याच्या मुळाशी सगुण-निर्गुणाचंच तर अधिष्ठान आहे. त्यातली स्पष्टता सांगणारे गोरोबांचे अभंगम्हणूनच तर महत्त्वाचे आहेत.

0 Shares
जग हे करणे शहाणे बापा जीवलग जोडगोळी