वारकऱ्यांचे गोरोबा काका

तुकाराम दैठणकर

आजच्या वारकर्यां ना संत गोरा कुंभारांविषयी काय वाटतं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. परभणी जिल्ह्यातील दैठणा येथील ठाकूरबुवा संस्थानचे प्रमुख डॉ. तुकाराम महाराज दैठणकर आणि पुण्यात आयटी इंजिनियर असणारे अभय जगताप या दोन पिढीच्या वारकर्यांिनी मांडलेले गोरोबाकाका.

वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानोबा आणि तुकोबाहे कळस. ज्ञानोबा-तुकोबा हा मध्यमपदलोपी समास आहे. या दोन  नावांमध्ये वारकरी संप्रदायाच्या संतमांदियाळीचा उच्चार आहे. यात निवृत्तीनाथ, सोपानदवे, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ, गोरा कुंभार, चोखोबा, नरहरी सोनार, सावता माळी, सेना न्हावी, दासी जनी अशा सर्वांचा समावेश आहे. आध्यात्मिक आणि संप्रदायाच्या भूमिकेवरसर्व संतमंडळी समानच होती. असा याचा स्पष्ट आणि सरळ अर्थ होतो.

मानवाचा आध्यात्मिक विकास व्हावा, तो जन्मतःच या फेर्‍यातूनमुक्त व्हावा, यासाठी संतांनीईश्वरभक्ती हे साधन दिलं आहे.तुकारामांनी‘अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जडजीव ॥’ या वाक्यातून ही भूमिका स्पष्ट केली आहे. ही भूमिका साध्य करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी भक्ती संप्रदायाची उत्कृष्ट मांडणी केली. ‘आपल्या सारिखे करिती तत्काळ’ या भूमिकेवरच संतांना संतम्हणूनसंबोधलं. त्यामुळंच जाणकार वारकरी सर्व संतांना ज्ञानदेवांच्यातोडीचंच मानतात. ज्ञानदेवांच्या जीवनात चमत्कार दिसूनयेतात. त्यामागचा हेतू ‘रेड्यामुखी वेदबोलविला । गर्व द्विजांचा हरविला ॥’ असा स्पष्ट करतात. त्याकाळी पैठणची विद्वान ब्राह्मणमंडळी विद्वत्ता वादविवादात घालवत होती. त्याचा समाजाला काहीही उपयोग राहिला नव्हता. अशा ज्ञानसत्तेला बदलवण्यासाठी आणि त्यांना  समाजाभिमुख करण्यासाठी ज्ञानदेवांनी हा चमत्कार केला.

गोरा कुंभार यांच्याही संदर्भात असे काही चमत्कार दिसतात. विठ्ठलानंत्यांच्या घरी येऊन कुंभारकाम केलं आहे.तसंच गोरोबांचे हातही पुन्हा मिळवूनदिले आहेत. विज्ञाननिष्ठ काळात यावर विश्वास बसत नाही. संतांचं जीवन अतिशय दिव्य असतं.त्यांच्याआयुष्यातील दिव्य घटनांचं आकलनही दिव्य बुद्धीच्या बळावर होऊशकतं.संतांच्या चरित्रातील या घटना सातशे, आठशे वर्षांपूर्वीच्या आहेत. त्याचं विश्लेषण आजच्या मानसिकतेत आणि सामान्य बुद्धीच्या बळावर करताना बहुतांशी ते चुकीचं असत.

वारकर्‍यांमध्ये तीन प्रकार करता येतील. एक, निष्ठावान अभ्यासू वारकरी. दुसरा, निष्ठावान साधा भोळा वारकरी. तिसरा, झालेला वारकरी. पहिल्या दोन वारक-यांना एकच माहीत आहे, की गोरोबा काका खूप मोठे संत होते. त्यांनी समाजामध्ये भक्तिजीवन उभंकरण्यासाठी मोलाचा प्रयत्न केला. त्याच बरोबर त्यांनी सुंदर अशा अभंगरचना केल्या.लोकांना सोबत  घेऊन पंढरीची वारी केली. त्याचा आध्यात्मिक अधिकार समजून घेण्यासाठी त्यांची एक कथा लक्षात येते. ती म्हणजे मुक्ताबाईंनी त्यांना नामदेवांची घ्यायला लावलेली परीक्षा.

आजही अनेकांजवळ पाण्यावर तरंगणार्‍या विटा आहेत. त्या गोरोबाकाकांनी तयार केलेल्या आहेत. त्या विटासांठी लागणारी माती भगवान विठ्ठलानंआपल्या हातांनीआणलेली होती. म्हणून त्या आजही अनेकांच्यापूजेतआहेत. म्हणूनचसंततुकाराम विठ्ठलाचं वर्णन करताना लिहितात, ‘घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची।’

एकूणच सर्व वारकरी संतांच्या जीवनात त्यांनी आपलं विहित कर्मकरीत करतच ईश्वरभक्तीकेलेली आहेआणि स्वतः देवानं त्यांच्या सामान्यातील सामान्य कर्मामध्ये प्रत्यक्ष मदत केलीय. कोणत्याही संतानं आपली जात लपवलेली दिसत नाही. तर त्यांनी आपल्या जातीचा आणि कर्माचा अभिमान बाळगलेला  दिसतो. समाज रचनेमध्ये आणि व्यवहारामध्ये हे अत्यंत  महत्त्वाचंचहोतं. गीतेचा मुख्य विषय कर्मयोग आहे. शुद्ध कर्माद्वारे चित्त शुद्धी होते. ती भक्तीची पहिली गरज आहे. आपल्या कर्मालाच भक्तीपर केलंजावं हा विश्वरचनेतील महत्त्वाचा भाग आहे. पण कुंभार समाजातील लोकच गोरोबा काकांचं मंदिर बांधत आहेत. माळीच सावताबाबांचं मंदिर बांधत आहेत. तुकारामांचं मंदिर कोणी मराठा व्यक्ती बांधत आहे. हे आजच्या सामाजिक मानसिकतेत दिसतं. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. संतांना विश्वरचनेत कुठल्यातरी जातीत जन्म घ्यावा लागला. पण ते सर्वार्थानं सर्वांचेच आहेत. आम्हा वारक-यांना वाटलंपाहिजे की चोखोबा, गोरोबा हे ज्ञानदेवांएवढेच मोठे आहेत, नाही ते ज्ञानदेवच आहेत. या भावनेनं त्यांच्याकडे पाहिलं तरच भक्ती आणि संप्रदाय टिकेल. एक काळजी घेण्याची गरज आहे.

– संतांची मंदिर बांधू नका. भक्तीसाठी विठ्ठल मंदिर बांधा आणि त्यात या सर्व संतांचं वाङमय ग्रंथरूपात पूजेसाठी आणि भजनासाठी ठेवा.

0 Shares
संतांचा सर्वंकषवाद हाती थापटणे अनुभवाचे