सावतोबांच्या संदर्भखुणा

Ringan

संत सावता माळी यांच्यावरची पुस्तकं, पुस्तकातले लेख, विशेषांक, सिनेमा यांची अभ्यासकांसाठीची यादी. ही सगळीच पुस्तकं आम्ही संदर्भ म्हणून वापरली नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी

संतशिरोमणी श्री सावता माळी यांचे काही अभंग, मोतीराम वानखडे, सत्योदय छापखाना, करजगाव, अमरावती, १९१९.

महर्षी श्री संत सावता माळी यांचं चरित्र, मोतीराम तुकाराम वानखडे, सत्योदय छापखाना, करजगाव, अमरावती, १९२२.

सांवता माळी (प्रकरण), श्री नामदेव महाराज आणि त्यांचे समकालीन संत, जगन्नाथ रघुनाथ आजगावकर, प्रकाशक : ज. र. आजगावकर, मुंबई, १९२७.

संत शिरोमणी श्री सांवता चरित्र, गोविंद विठ्ठल राऊत, प्रकाशक : श्री सांवता साहित्य कार्यालय, वरुड, अमरावती, १९३०.

श्री सांवता माळी चरित्र (कीर्तनोपयोगी आख्यानातले ७७ श्लोक), संतकवी श्री दासगणू महाराज, पुणे,१९३८.

भक्तीचा मळा (मराठी सिनेमा), दिग्दर्शक : केशवराव दाते, निर्माता : व्ही. शांताराम (राजकमल कंपनी, मुंबई), कथाकार आणि गीतकार : सदाशिव अनंत शुक्ल, १९४४.

माली (हिंदी सिनेमा), राजकमल कंपनी, १९४४.

श्री सांवता महाराज महात्म्य, लेखक : भिकू सावळाराम भुजबळ, श्री सांवता माळी प्रिंटिंग प्रेस, माळीनगर, सोलापूर, १९४५.

सांवताने केला मळा, ग. द. माळी गुरुजी, श्री आदर्श पुस्तकालय, धुळे, पहिली आवृत्ती १९७३.

संत सांवता आणि संत जनाबाई, कुमुदिनी पवार, अरगडे कुलकर्णी प्रकाशन, पुणे, १९७५.

सावतामाळी (नोंद), मराठी वाङ्मयकोश, खंड पहिला मराठी ग्रंथकार, संपादक गं. दे. खानोलकर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई,१९७७.

श्री संतशिरोमणी सांवता महाराजांचे चरित्र, पोपटबुवा दगडू ताजणे, श्री क्षेत्र आळंदी देवाची, पुणे, १९७८.

संत सावता माळी (कीर्तन), श्री स्वानंद सुखनिवासी जोग महाराजकृत सांप्रदायिक नैमित्तिक कीर्तनमाला, भाग दुसरा, संपादन : नथुसिंग डोंगरसिंग राजपूत, प्रकाशक : चिंधू राजाराम पाटील, वाघळुद, जळगाव, १९८०.

आद्यसंत श्री सांवता महाराज, सुदाम सावरकर, साहित्यप्रभा प्रकाशन, अमरावती, १९८०.

संत सांवता दर्शन, डॉ. हेमंत विष्णू इनामदार, महात्मा फुले मंडळ, पुणे, १९८३.

संत सांवता माळी (मुलांसाठी चरित्र), शिवराम वाशीकर, जयहिंद प्रकाशन, मुंबई, १९८२.

श्री सावतामाळी व कूर्मदास चरित्र, प्रा. र. रा. गोसावी, सौ. वीणा र. गोसावी, सारथी प्रकाशन, पुणे, १९८३.

संत सावतामाळी दिवाळी विशेषांक, साप्ताहिक पंढरी संदेश, संपादक – डॉ. गोपाळ बेणारे, प्रकाशक – गजानन बिडकर, पंढरपूर, १९८३.

संत सावतामहाराज विशेषांक, मासिक ज्ञानराज, संपादक – राम करंदीकर, प्रकाशक – द. स. शिंदे, ठाणे, १९८६.

संत शिरोमणी श्री सांवता महाराज यांचे चरित्र, मोरेश्वर वाळिंबे, महात्मा फुले मंडळ, पुणे, १९८८.

गोष्ट श्री संत सावतोबांची, मोरेश्वर वाळिंबे, प्रकाशक : मा. गो. डोमाळे, १९९०.

शिरोमणी श्री सांवता महाराज विशेषांक, मासिक ज्योती आवाज, संपादक : कृष्णकुमार शिनलकर, पुणे, १९९३.

श्री सावता महाराजांची पंढरीची वारी, लेखक प्रकाशक गोपाळराव पाटील, खंडाळी, जि. सोलापूर, १९९४.

संत साँवता माली, (हिंदी चरित्र), मुरलीधर जगताप, प्रकाशक : मा. गो. डोमाळे, १९९४.

श्री संत सावतामाळी, (लेख) रामचंद्र शिंदे, मासिक भक्तिसंगम, १९९४.

संत शिरोमणी श्री सावता महाराजांचे अभंग, प्रकाशक – अॅाड. विजय शिंदे, पहिली आवृत्ती २००२.

संत सावता महाराज, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, कौसल्या गोरे, प्राजक्त प्रकाशन, २००३.

संत सावतामाळी महाराज, अनिल दीक्षित, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००५.

सावतोबांचा अभंग करी रहस्याचा भंग (लेख), ईश्वरनिष्ठांच्या पाऊलखुणा, वा. ल. मंजुळ, उत्कर्ष प्रकाशन, पुणे, २००८.

सावता सागर प्रेमाचे आगर, विशाल रघुनाथ गडगे, पुणे, २०१४.

माळी समाजातील संत, बालमोहन आदलिंगे, सुविद्या प्रकाशन, सोलापूर, २०१५.

भक्तीचा मळा, अॅचड . देवदत्त परुळेकर, अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर, २०१६.

भक्तीचा मळा संत शिरोमणी सावता माळी जीवन दर्शन, ओंकार महाराज माळी, श्री माळी वैभव प्रकाशन कार्यालय, नागपूर, २०१६.

श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचे संक्षिप्त चरित्र व अभंग, संकलक : देविदास नंदरधने, श्री माळी वैभव प्रकाशन कार्यालय, नागपूर, २०१६.

धन्य ते अरण, विजय बळवंत कुलकर्णी, प्रकाशक – अॅरड. विजय विठ्ठल शिंदे, अरण, २०१७.

सावता म्हणे केला मळा (लेख), संत परंपरा आणि कृषिसंस्कृती, प्रा. वामन जाधव, हर्मिस प्रकाशन, २०१७.

संत शिरोमणी श्री सावता महाराजांचे चित्रमय चरित्र, डॉ. वि. य. कुलकर्णी, प्रकाशक : अॅषड. विजय शिंदे, अरण, चौथी आवृत्ती २०१७. (मूळ आवृत्ती महात्मा फुले मंडळ, पुणे, २०००)

संत शिरोमणी श्री सावता महाराज अभंग चरित्र व महात्म्य ग्रंथ, पारायण प्रत, संकलन – सुनील तोडकर, जनवार्ता, अहमदनगर, २०१८.

सांवता माळी, (प्रकरण), नामदेवरायांची प्रभावळ, डॉ. शिवाजीराव निवृत्ती मोहिते, श्री गंधर्ववेद प्रकाशन, पुणे, २०१८.

पुरोगामी विचारांचा द्रष्टा संत संत शिरोमणी सावता महाराज ललित चरित्र, प्रा. सावता भानुदास घाडगे, संत सावता माळी सेवाभावी न्यास, अरण, २०१८.

श्री संत सावतामाळी चरित्र, अरविंद पाटोळे, प्रकाशन – प्रकाश कुंदूर, पुणे, प्रकाशन वर्षाची नोंद नाही.

श्री संत सावता महाराज पाळणा, प्रकाशक – श्री संत सावतेबुवा महाराज देवस्थान ट्रस्ट, अरण, प्रकाशन वर्षाची नोंद नाही.

श्री संतशिरोमणी सावता महाराज भजन संग्रह, संपादन – अविनाश डोके आणि इतर, श्री संतशिरोमणी सावता महाराज भजन मंडळ, भायखळा, मुंबई, प्रकाशनवर्ष नोंद नाही.

संत सावता माळी, (व्हिडीयो सीडी), दिग्दर्शक : राजू फुलकर, सुमित म्युझिक, प्रकाशनवर्ष नोंद नाही.

संत सावता माळी कथा, (व्हिडीयो सीडी), सुमित कॅसेट्स कंपनी, प्रकाशनवर्ष नोंद नाही.

संत सावता माळी (व्हिडीयो सीडी), दिग्दर्शक : राजेश लिमकर, फाउंटन एंटरटेनमेंट कंपनी, प्रकाशनवर्ष नोंद नाही.

0 Shares
इतिहास घडवणारा भक्तीचा मळा संत सावता अभंगगाथा