तुझे रूप चित्ती राहो

सुनील घुमे

‘तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम’ हे गाणं ऐकताच आपल्या मनात गोरोबा साकार होतात. ही तर जादू आहे सिनेमा या माध्यमाची. गोरोबांच्या विलक्षण अशा चरित्रकथेकडे आजवर सहा भाषांतल्या सिनेमावाल्यांचं लक्ष गेलं.

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम… ‘संत गोरा कुंभार’ सिनेमातलं हे गाणं. सुधीर फडकेंच्या आवाजातलं. ग. दि. माडगूळकरांनी शब्दबद्ध केलेलं. हे गाणं ऐकायला किती गोड वाटतं? पण सिनेमात हेच गाणं संपता संपता जे काही घडतं ते केवळ धक्कादायक!

तुझ्या पदी वाहिला मी देहभाव सारा
उडे अंतराळी आत्मा, सोडूनी पसारा
नाम तुझे घेतो गोरा, म्हणूनी आठ याम
पांडुरंग जय पांडुरंगपांडुरंग जय पांडुरंग
पांडुरंग जय पांडुरंगपांडुरंग जय पांडुरंग

अशा गजरात तल्लीन झालेले संत गोरोबा कुंभार मडकी घडवण्यासाठी केलेल्या मातीच्या चिखलात आपल्याच बाळाला तुडवत आहेत. आपल्या पायाखाली रक्तामांसाचा कोवळा गोळा चेंदामेंदा होतोय, याची त्यांना कल्पनाही नाही. संती ते हृदयद्रावक दृश्य पाहते आणि हंबरडा फोडते. तेव्हा कुठं संत गोरोबा भानावर येतात.

१९६७ साली रूपेरी पडद्यावर ‘संत गोरा कुंभार’ हा सिनेमा आला. कथा, पटकथा, संवाद आणि गीतं सगळं काही ग. दि. माडगूळकरांचं. सुधीर फडकेंचं संगीत आणि पार्श्वगायन. राजा ठाकूर यांचं दिग्दर्शन. असा तिहेरी संगम यानिमित्तानं जुळून आला.

यात कुमार दिघेंनी गोरा कुंभारांची भूमिका साकारली, तर सुलोचनाबाईंनी संतूची म्हणजे गोरोबाकाकांच्या पत्नीची. ही भूमिका साकारण्याआधी कुमार दिघे यांनी १९६४ साली आलेल्या ‘तुका झालासे कळस’ या सिनेमात तुकोबाराय साकारले होते, तर आवलीच्या भूमिकेत होत्या सुलोचना. ‘संत गोरा कुंभार’च्या निमित्तानं ही जोडी पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर झळकली. त्यातली सुलोचना बाईंनी साकारलेली ‘संतू’ म्हणजे गोरोबाकाकांची कुंभारीणच प्रेक्षकांच्या स्मरणात कायमचं घर करून राहिली. अर्थात हा सिनेमा पाहताना संतूच्या भूमिकेतल्या सुलोचना बाईंवर आवलीचा प्रभाव चांगलाच जाणवतो. म्हणजे विठ्ठलाला संतापानं बोल लावणं. भक्तांची पोरं खाणारा असला कसला तुमचा देव, असं रागानं म्हणणं, या सगळ्यावर छटा दिसली ती आवलीची म्हणजे तुकोबांच्या बायकोची.

‘संतपटांची संतवाणी’ या इसाक मुजावर यांच्या पुस्तकात त्याबाबतची छान आठवण सांगितली आहे. खरंतर सुलोचनाबाई सुरुवातीला ही भूमिका करायलाच तयार नव्हत्या. कारण त्यांच्याआधी १९४२ साली आलेल्या छाया फिल्मच्या ‘गोरा कुंभार’ या सिनेमात ललिता पवार यांनी अत्यंत ताकदीनं संतू उभी केली होती. हा ‘गोरा कुंभार’ चाळीसच्या दशकात चांगलाच लोकप्रिय ठरला. बाबूराव महिंद्रकर यांचा गोरोबा आणि ललिता पवार यांची संतू प्रेक्षकांच्या मनात ठसली होती. त्यामुळं आपल्याला ही भूमिका पेलेल का, याबाबत सुलोचना बाई साशंक होत्या. त्यांनी जवळजवळ नकारच कळवला होता. मात्र गदिमा, राजा ठाकूर आणि निर्माते विनायकराव सरस्वते हटूनच बसले.

त्यांनी कसंबसं सुलोचना बाईंना या भूमिकेसाठी राजी केलं आणि याच भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. मात्र त्यावरूनही थोडं मानापमान नाट्य रंगलं. कारण सुलोचना बाईंना जो पुरस्कार जाहीर झाला, तो होता विशेष अभिनेत्रीचा. मुख्य अभिनेत्रीचा नाही. या सिनेमात त्याच मुख्य नायिका होत्या. त्यामुळं पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकून सुलोचना बाईंनी तो नाकारला. अखेर सरकारला आपली चूक उमगली. सरकारनं मंत्रालयात सुलोचना बाईंना सन्मानानं बोलावून सर्वोत्कृष्ट नायिकेचा पुरस्कार प्रदान केला.

या सिनेमाच्या आधी संत गोरा कुंभार यांच्यावर दोन सिनेमे आले होते. एक १९४२ साली आणि सर्वात पहिला १९२३ साली म्हणजे मूकपटांच्या जमान्यात. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी हिंदुस्थान फिल्म कंपनीसाठी ‘भक्त गोरा कुंभार’ हा मूकपट दिग्दर्शित केला होता. बोलपट सुरू झाल्यानंतर १९४२मध्ये ‘छाया फिल्म’चा ‘गोरा कुंभार’ सिनेमा आला. आनंदकुमार दिग्दर्शित या सिनेमात ललिता पवारांची भूमिका गाजली. त्या सिनेमात गोरोबांची दुसरी पत्नी साकारली होती रत्नमाला बाईंनी. तर संत ‘गोरा कुंभार’मध्ये उमाने त्या भूमिकेत जान टाकली.

या दोन्हीसिनेमांतगोरोबांच्या जीवनातील आपल्या सर्वांना माहीत असलेले प्रसंगयेतात. पण गोरोबांच्या या कथेला गदिमांनी‘संतगोरा कुंभार’मध्ये थोडासिनेमॅटिक तडकाही दिला आहे.तो लीला गांधी यांच्या रूपानं. एक खाष्ट, मत्सरी पाटलीण लीला गांधींनी साकारली. संतूच्याच गावची असलेली ही मूळची कुंभारीण पण पाटलासोबतदुसरं लग्न करून ती पाटलीण बनते. तिला मूलबाळ नसल्यानं आणि संतू गरोदर राहिल्यानंतिचा आणखीच जळफळाट होतो. गावातील कुणीही संतूच्या मदतीला जाऊ नये, अगदी तिला प्रसूतीवेदनाहोत असताना सुईणपण जाऊ नये, अशी तंबीच या पाटलीणीनं दिलेली असते.त्यामुळं गावची एकही बाईसंतूच्या मदतीला जात नाही. तिला प्रसूतीवेदनाहोत असताना नेमकी वारीला निघालेलीसंतमंडळी गोरोबाकाकांच्या घरी येतात. संतजनाबाईआणिमुक्ताई संतूचीसुखरूपप्रसूती करतात. तिच्या पोटीगोंडस बाळ जन्माला येतं.

विशेष म्हणजे या प्रसंगाला जोडूनचसंतनामदेवांच्यापरीक्षेचा प्रसंगजोडूनघेतलाय. संगीतनाटकांमधले गायक, अभिनेते पद्मश्री प्रसाद सावकार यांनी नामदेवांची भूमिका साकारलीय. नामदेवांचं मडकं कच्चंकी पक्कं हा प्रसंगअत्यंतसुंदरपणे या सिनेमात जिवंत झालाय.

गोरोबाकाकांच्याकथेत एवढा ठासून मसाला भरला असल्यानंहिंदी सिनसृष्टीलाही त्यांची भुरळ पडली नसती, तरच नवल. हिंदीत १९४०च्या दशकात ‘गोरा कुंभार’ नावाचा सिनेमा आल्याची नोंद सापडते. पण त्याच्याविषयी आणखी काहीच माहिती मिळत नाही. कदाचित १९४२च्या मराठी सिनेमाचीच ती आवृत्ती असावी. आणखी एक हिंदीतला ‘भक्त गोरा कुंभार’ १९८१ साली पडद्यावर आला. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजेहा रंगीतहोता. त्याआधीचे गोरा कुंभारांवरचे सिनेमे ब्लॅकअँड व्हाईटहोते. पण हा सिनेमामूळ हिंदीत बनला नव्हता. गुजराती भाषेत बनलेल्या‘भगत गोरा कुंभार’ या सिनेमाचा डब अवतार होता. या दोन्हीसिनेमांमध्ये ख्यातनाम नट अरविंद त्रिवेदीयांनी गोरा कुंभार साकारला होता. अरविंद त्रिवेदी म्हणजे दूरदर्शनवर गाजलेल्या‘रामायण’ या मालिकेतील रावण. तर संतूची भूमिका केली होती मराठीतल्या प्रसिद्ध अभिनेत्रीसरला येवलेकरयांनी. या सिनेमातली गाणी खूपच गाजली. शिवाय गुजरातमध्ये कुंभार समाजाची संख्यामोठी आहे.त्यांनीही हा सिनेमाउचलून धरला. त्यामुळे हा सिनेमा हिट झाला. त्यानंतरगुजरातीमध्ये गोरा कुंभारांचा समावेशबोधकथा, आख्यानं, प्रवचनंआणि लोकगीतांमध्ये होऊ लागला. प्रसिद्ध लोकगायक भिखुदान गढवी यांनीगोरोबांचं गाण्यांतून सादर केलेलं आख्यानही लोकप्रिय आहे.

त्याशिवाय कन्नड भाषेतही ‘भक्त कुंबारा’ हा सिनेमाही गोरोबांच्याआयुष्यावर होता. कन्नड सिनेमातले सुपरस्टार डॉ. राजकुमार यांनी त्यात प्रमुख भूमिका साकारली आहे.१९७४साली मद्रासच्या लक्ष्मी फिल्म कंबाईन्ससाठी प्रख्यात दिग्दर्शकहुन्सुर कृष्णमूर्तीयांनी हा सिनेमा केलाय. त्यातलेचमचमतेकपडे, भडक अभिनय, नाचगाणी यामुळं आपण एखादा पौराणिक सिनेमाबघतोय असंवाटतं. पण सिनेमाच्या सुरुवातीच्या निवेदनात सत्तरच्या दशकातलं पंढरपूर आणि वारी यांचं खरखुरं चित्रण आहे. भाषा कळत नसली तरी तेपाहण्यासारखंआहे.

कन्नड सिनेमा सुपरहिट ठरल्यामुळं लक्ष्मी कंबाईन्सनेच १९७७साली त्याचा तेलुगू आणि तामिळ रिमेक केला. तेलुगूतील सुपरस्टार एएनआर म्हणजे अक्कीनेनी नागेश्वर राव यांनी त्यात गोरा कुंभारांची भूमिका केली. व्ही. मधुसूदन राव त्याचे दिग्दर्शक होते. मात्र या सिनेमाच्या नावात गोरा कुंभारांचं नाव नव्हतं. त्याचं नाव होतं, ‘चक्रधारी’. या सिनेमात नंतर हिंदी सिनेमा गाजवलेल्या जयाप्रदानं गोरोबांच्या दुसर्‍या पत्नीची भूमिका केली होती. तेव्हा ती नुकतीच सिनेमात आली होती. दक्षिणेतल्या तिन्ही भाषेतले गोरोबांचे सिनेमे हिट झाले आणि त्यातली गाणीही. १९६० सालीही ‘गोरा कुंभार’ नावाचा एक कन्नड सिनेमा आला होता. पण त्याचे तपशील सापडत नाहीत.

संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित काही व्हिडीओपट किंवा टेलिफिल्मही निघाल्या. सुमित म्युझिकच्या वतीनं २००६ साली राजू फुलकर यांनी ‘संत गोरा कुंभार’ हा व्हिडीओपट दिग्दर्शित केला. यातलं ‘देवा तुझा मी कुंभार’ हे शीर्षक गीत सोडलं तर त्यात फार काही पाहण्यासारखं नाही. हाच व्हिडीओपट हिंदीतही डब करण्यात आला. प्रकाश धोत्रे यांनी गोरोबांची आणि सारिका निलटकर यांनी संतीची भूमिका साकारलीय. या व्हिडीओपटात तोंडी लावायला अविनाश नारकर आहेत, पण ते नामदेवांच्या भूमिकेत.

२०१३मध्ये व्हिनस कंपनीनं अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांना प्रमुख भूमिकेत घेऊत ‘संत गोरा कुंभार’ हा व्हिडीओपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. त्यात संजय खापरेंनी नामदेवांची आणि दीपाली सय्यदनं रामीची भूमिका केली आहे. हा व्हिडीओपट थोडाफार सुसह्य आहे. जुन्या गाजलेल्या गोरोबापटांतील स्वप्नील बांदोडकरांनी गायलेली गाणी ही देखील या व्हिडीओपटाची जमेची बाजू म्हणता येईल. यापाठोपाठ ‘टी सिरीज’ कंपनीनं २०१६मध्ये ‘संत गोरा कुंभार’ नावाची टेलिफिल्म काढली. शिरीष लाटकर यांनी त्या टेलिफिल्मची कथा लिहिली आहे. यामध्ये डॉ. गिरीश ओक यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्याला गोरोबांची प्रमुख भूमिका देण्यात आली. मात्र ते काही या भूमिकेला फारसा न्याय देऊ शकले नाहीत.

या सगळ्या गोरोबापटांमध्ये अर्थातच उठून दिसतो, तो गदिमा, कुमार दिघे आणि सुलोचनाबाईंचा ‘संत गोरा कुंभार’. सत्तरच्या दशकापासूनचे गोरोबांचे सगळे सिनेमे यूट्युबवर उपलब्ध आहेत. चला तर मग, वेळ कसला दवडताय गोरोबा काका तुमची वाट पाहत आहेत,

ऊठ पंढरीच्या राजा,वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी, दर्शनासी आला

———————

विठ्ठला तू गोरा कुंभार

‘तुझे रूप चित्ती राहो असो’, वा ‘ऊठ पंढरीच्या राजा’ असो, संत गोरा कुंभार सिनेमातली गाणी रसिकांना संत गोरा कुंभारांचे अभंगच वाटत आलेत. पण तसं नाहीय. गदिमांचे शब्द, सुधीर फडकेंची चाल आणि स्वर लाभलेली ही सिनेमासाठी लिहिलेली गाणी आहेत. तेच या दोघांच्या प्रतिभेतून अवतरलेल्या आणखी एका गाण्याविषयी झालंय.

फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार

गदिमांच्याच एका कादंबरीवर आधारित १९६१सालच्या ‘प्रपंच’ या गाजलेल्या सिनेमातलं हे गाणं आहे. मुख्य कथानकातील पात्रांची हलाखीची स्थिती आणि इतरांची मौजमजा या विरोधाभासातून दुःख अधोरेखित करण्याचं काम या गाण्यात होतं. पण हे फक्त सिनेमातल्या काही जणांच्या दुःखाचं गाणं न उरता विषमतेचा बळी ठरलेल्या सर्वच वंचितांचं आर्त रुदन ठरलं.

तूच घडविशी, तूच तोडशी,
कुरवाळीशी तू, तूच ताडशी
न कळे यातून काय जोडशी
देशी डोळी, परि निर्मिशी
तयापुढे अंधार

गदिमांच्या गाण्यावर संतांच्या रचनांचा प्रभाव स्पष्ट आहे. त्यांनीच संत निवृत्तीनाथ, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार अशा दुर्लक्षित संतांवर सिनेमे बनवण्यात पुढाकार घेतला. संतांच्या या प्रभावाचा परिसस्पर्श या गाण्यालाही झालाय. त्यामुळे अनेकांना हे गाणं संत गोरा कुंभारांचा अभंग वाटतो. पण ते तसं नाहीय.

0 Shares
गोरोबा सिनेमाज् एक नवी आख्यायिका